ताबा सुटलेला ट्रक थेट घुसला बाजारपेठेत! शिरगाव येथील अपघातामध्ये 6 लाखांचे नुकसान

गोकुळ शिरगाव वार्ताहर पुणे- बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे रविवारी मध्यरात्री वेगात असलेल्या ट्रकचालकाचा त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने गोकुळ शिरगाव येथे पूर्व बाजूस असलेल्या बाजारपेठेत हा ट्रक घुसला. रात्र असल्याने मोठा अनर्थ टळला तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र वाहनांचे व या ठिकाणी उभे असलेल्या चहा गाडीचे असे मिळून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले […]

ताबा सुटलेला ट्रक थेट घुसला बाजारपेठेत! शिरगाव येथील अपघातामध्ये 6 लाखांचे नुकसान

गोकुळ शिरगाव वार्ताहर

पुणे- बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे रविवारी मध्यरात्री वेगात असलेल्या ट्रकचालकाचा त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने गोकुळ शिरगाव येथे पूर्व बाजूस असलेल्या बाजारपेठेत हा ट्रक घुसला. रात्र असल्याने मोठा अनर्थ टळला तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र वाहनांचे व या ठिकाणी उभे असलेल्या चहा गाडीचे असे मिळून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
गोकुळ शिरगाव पुणे बेंगलोर मुख्य मार्गावर पूर्व बाजूस असलेल्या बस स्टॉप वरून सर्विस रोडवर बेंगलोरच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने हा ट्रक इंद्रजीत पाटील यांच्या इमारती समोर उभे असलेल्या चायनीज गाडी, चहाचे हॉटेल, गोकुळ दूध संघाचा टेम्पो व अंबाई हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या उभ्या असलेल्या कारवर जोरदार ट्रकने धडक दिल्याने या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .यामध्ये गोकुळ दूध संघाचा उभ्या असलेल्या टेम्पोतील दुधाचे सुद्धा या ठिकाणी नुकसान झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी रात्र असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून या ट्रकचा चालक वसंत हनुमान जगताप (वय 36) रा. कोथळे ता. पुरंदर जि. पुणे याच्या विरोधात डॉ. राहुल ज्योतिबा होडगे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख व ईदे करीत आहेत.