कसबा बीड परिसरात संततदार पाऊस! महे- बीड पुलावर पाणी
नागरिकांनी पाण्यातून प्रवास न करता पर्याची मार्गाचा अवलंब करणे गरजेचे
कसबा बीड / वार्ताहर
कसबा बीड परिसरात संततधार पावसामुळे तसेच राधानगरी व तुळशी धरण यांचे पाणी तसेच ओढे व नदी नाले वोसंडून वाहत आहे . चार दिवस संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी वाढल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये कसबा बीड भागातील कोगे – बहिरेश्वर , कोगे – कुडीत्रे, या बंधाऱ्यावर अगोदच पाणी आले आहे. आज महे – कसबा बीड दरम्यान असणाऱ्या पुलावर पाणी आले आहे.
त्यामुळे कोल्हापूर ते आरळे जाणाऱ्या सर्व प्रवासी व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.पुलावरून पाणी वाहत असताना त्यामधून जीविताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महे व कसबा बीड ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना माहिती दिली आहे. त्याच बरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुराचे पाणी वाढत असलेने सुरस्थित ठिकांणी स्थलांतरीत व्हावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी कसबा बीड परिसरात संततदार पाऊस! महे- बीड पुलावर पाणी
कसबा बीड परिसरात संततदार पाऊस! महे- बीड पुलावर पाणी
नागरिकांनी पाण्यातून प्रवास न करता पर्याची मार्गाचा अवलंब करणे गरजेचे कसबा बीड / वार्ताहर कसबा बीड परिसरात संततधार पावसामुळे तसेच राधानगरी व तुळशी धरण यांचे पाणी तसेच ओढे व नदी नाले वोसंडून वाहत आहे . चार दिवस संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी वाढल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये कसबा बीड भागातील कोगे – बहिरेश्वर […]
