मंडलिक यांचे फोटो व्हायरल करण्याची गरजच काय ? सतेज पाटलांचे संतुलन बिघडलय; महाडिकांचा हल्लाबोल

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले असतानाच पुन्हा एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या पायऱ्या झडत आहेत. एकमेकांवर आरोप करण्यात येऊन एकमेकांच्या कुंडल्या जगजाहीर करण्याची धमकी बोलले जात आहे. सेनापती कापशी येथील एका जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीका करताना खासदार संजय मंडलिक यांचे काही फोटोज व्हायरल करण्याची धमकी दिली. सतेज […]

मंडलिक यांचे फोटो व्हायरल करण्याची गरजच काय ? सतेज पाटलांचे संतुलन बिघडलय; महाडिकांचा हल्लाबोल

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले असतानाच पुन्हा एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या पायऱ्या झडत आहेत. एकमेकांवर आरोप करण्यात येऊन एकमेकांच्या कुंडल्या जगजाहीर करण्याची धमकी बोलले जात आहे. सेनापती कापशी येथील एका जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीका करताना खासदार संजय मंडलिक यांचे काही फोटोज व्हायरल करण्याची धमकी दिली. सतेज पाटलांच्या या धमकी नंतर आणि आक्रमक भूमिके नंतर कोल्हापुरात च्या राजकीय परिप्रेक्ष्यात प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीचे नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेपूर्वी काल धनंजय महाडिकानी सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला माध्यमाने त्यांना सतेज पाटील यांनी केलेल्या विधानावर छेडले असता त्यांनी उपरोधक टोला हाणला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आमदार सतेज पाटलांनी महाराजांच्या पाया पडतानाचा संजय मंडलिक यांचा फोटो व्हायरल करण्याची गरज काय आहे. आम्ही आजही महाराजांचा आदर करतो उद्याही करत राहीन. खासदार संजय मंडलिक यांचा फोटो व्हायरल केल्यावर उलट संजय मंडलिक यांचा आदर वाढणार आहे.सतेज पाटलांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. यापूर्वीही त्यांनी काठी घेऊन बसणार अशी वक्तव्य केली होती. त्यांच्या भाषेवरचा तोल गेलेला असून त्यांना कोल्हापूरचे बिहार करायचे आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला आहे हे दिसून येत आहे.”  असा उपरोधिक टोला धनंजय महाडिक यांनी हाणला.