मौजे गजापूर पैकी मुसलमानवाडीत तातडीची मदत; प्रापंचिक साहित्य आणि घर दुरुस्तीसाठी धनादेश प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी विशाळगड येथील अतिक्रमणमुक्ती मोहीमवेळी समाजकंटकांकडून मौजे गजापूर पैकी मुसलमानवाडी येथील घरांवर हल्ला करुन नासधुस करण्यात आली होती.या नुकसानग्रस्त कुटुंबांना बुधवारी शासनाकडून प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार आणि घर दुरुस्तीसाठी 25 हजार रुपये अशी 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली. मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी या गावामध्ये 14 जुलै रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने […]

मौजे गजापूर पैकी मुसलमानवाडीत तातडीची मदत; प्रापंचिक साहित्य आणि घर दुरुस्तीसाठी धनादेश प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी

विशाळगड येथील अतिक्रमणमुक्ती मोहीमवेळी समाजकंटकांकडून मौजे गजापूर पैकी मुसलमानवाडी येथील घरांवर हल्ला करुन नासधुस करण्यात आली होती.या नुकसानग्रस्त कुटुंबांना बुधवारी शासनाकडून प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार आणि घर दुरुस्तीसाठी 25 हजार रुपये अशी 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी या गावामध्ये 14 जुलै रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधुस करुन प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यामध्ये प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झालेले होते. नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करुन शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे. वाडीमध्ये अंदाजे 56 कुटुंबे रहातात.या 56 कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी 41 घरांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत धनादेशाव्दारे देण्यात आली.वाडीतील इतर सर्व नुकसानीबाबत पंचनामे करुन विस्तृत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. हा अहवाल शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केला आहे.