छत्रपतींनी मशाल हाती धरली तर अख्खा महाराष्ट्र उजळून निघेल- संजय राऊत

कोल्हापूरची जागा ही शिवसेनेच्या ताब्यात असून गेली 30 वर्षे आम्ही सातत्याने लढतोय. या मतदार संघामध्ये शिवसेनेला मानणारा आणि मतदान करणारा मोठा गट असून कोल्हापूरची जागा न सोडण्यासाठी कोल्हापूरातील शिवसैनिकांचा मोठा दबाव आमच्यावर आहे.मी छत्रपतींचे नाव आज ऐकत असून आमची कोल्हापूरच्या जागेबाबत अजूनही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण छत्रपतींनी जर ठाकरे गटाची मशाल हाती धरली तर […]

छत्रपतींनी मशाल हाती धरली तर अख्खा महाराष्ट्र उजळून निघेल- संजय राऊत

कोल्हापूरची जागा ही शिवसेनेच्या ताब्यात असून गेली 30 वर्षे आम्ही सातत्याने लढतोय. या मतदार संघामध्ये शिवसेनेला मानणारा आणि मतदान करणारा मोठा गट असून कोल्हापूरची जागा न सोडण्यासाठी कोल्हापूरातील शिवसैनिकांचा मोठा दबाव आमच्यावर आहे.मी छत्रपतींचे नाव आज ऐकत असून आमची कोल्हापूरच्या जागेबाबत अजूनही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण छत्रपतींनी जर ठाकरे गटाची मशाल हाती धरली तर महाराष्ट्र अजून उजळून निघेल असे विधान ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पहा VIDEO >>> कोल्हापूरची जागा शिवसेनेच्याच ताब्यात; संजय राऊत यांचा खुलासा
काल दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात कोल्हापूर लोकसभा जागे संदर्भातील घडामोडींच्या चर्चांना एकच ऊत आला. कोल्हापूर लोकसभेची जागा हि महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसच्या वाट्याला गेली असून त्याबदल्यात सांगलीची जागा शिवसेनेच्या पदरात पडल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. या राजकिय घडामोडीसंदर्भातील बातम्या काही माध्यमांनी दाखवल्यानंतर काल जिल्हाभरात हा विषय चर्चेत राहीला.
यापुर्वीही काही दिवसांपासून कोल्हापूरच्या जागेवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती इच्छुक असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या. शाहू महाराज छत्रपतींनीही एका जाहीर कार्यक्रमामध्ये याबाबतचे संकेत दिले होते. काँग्रेसच्याही पक्षश्रेष्ठींनी ही जागा शाहूमहाराज लढत असतील तर आमचा सन्मानच असेल असे सुचक वक्तव्य केले होते.
दरम्यान, कालच्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं असून त्यांनी या सर्व चर्चा खोडून काढल्य़ा आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकली असून जिंकलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही हे महाविकास आघाडीचं सुत्र आहे. श्रीमंत शाहू महाराज यांना सर्व घटक पक्षांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं अशी भुमिका प्रथम पासूनच शिवसेनेची आहे. शाहू महाराजांसोबत लोकसभा लढण्याबद्दल अद्याप चर्चा झाली नसून काँग्रेसने काय सांगितले याची माहीती मला नाही. तसेच ती जागा शिवसेनेची असल्यामुळे मशाल चिन्हावर शाहू महाराज निवडणूक लढतील काय हे पहावं लागेल. छत्रपती शाहू महाराज जर मशाल हाती धरत असतील तर संपुर्ण महाराष्ट्र उजळून निघेल” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.