कोल्हापूर : रोहित शर्मा बाद झाल्यावर फॅन्सचं डोकं फोडलं

सध्या आयपीएलचे सामने सुरु आहे. चाहते आपापल्या टीमला सपोर्ट करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा आउट झाल्यावर चैन्नई सुपर किंग्झच्या चाहत्याला आनंद झाला. हे पाहून रागाच्या भरात येऊन मुंबई इंडियन्सच्या दोन चाहत्यांनी …

कोल्हापूर : रोहित शर्मा बाद झाल्यावर फॅन्सचं डोकं फोडलं

सध्या आयपीएलचे सामने सुरु आहे. चाहते आपापल्या टीमला सपोर्ट करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा आउट झाल्यावर चैन्नई सुपर किंग्झच्या चाहत्याला आनंद झाला. हे पाहून रागाच्या भरात येऊन मुंबई इंडियन्सच्या दोन चाहत्यांनी चैन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत वृद्ध इसमांचं डोकं फुटलं आहे. ही घटना करवीर तालूक्यात हणमंतवाडी येथे घडली आहे. 

सदर घटना करवीर तालुक्यातील हणमंतवाडीची असून मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर बंडोपंत बापुसो तिबिले(63) यांनी आनंद व्यक्त केला रागाच्या भरात येऊन बळवंत महादेव झांजगे आणि सागर झांजगे यांनी बंडोपंत यांच्यावर हल्ला करत त्यांचे डोके काठीने फोडले. या हल्ल्यात ते जागीच बेशुद्ध पडले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source