कोहली सराव शिबिरात दाखल
वृत्तसंस्था/ बेंगळूर
22 मार्चपासून 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रत्येक संघातील खेळाडूंनी गेल्या दोन दिवसांपासून आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. आरसीबीच्या सराव शिबिराला येथे प्रारंभ झाला असून विराट कोहली सोमवारी पहिल्यांदाच या शिबिरात दाखल झाला.
विराट कोहलीच्या आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही. आरसीबीच्या या आगामी स्पर्धेतील सलामीचा सामना विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज बरोबर चेन्नईत येत्या शुक्रवारी होणार आहे. 35 वर्षीय विराट कोहलीचे 2022 च्या भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अफगाण विरुद्धच्या सामन्यानंतर पुनरागमन होणार आहे. 1 जूनपासून अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोहलीची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत कोहलीने 639 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता.
Home महत्वाची बातमी कोहली सराव शिबिरात दाखल
कोहली सराव शिबिरात दाखल
वृत्तसंस्था/ बेंगळूर 22 मार्चपासून 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रत्येक संघातील खेळाडूंनी गेल्या दोन दिवसांपासून आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. आरसीबीच्या सराव शिबिराला येथे प्रारंभ झाला असून विराट कोहली सोमवारी पहिल्यांदाच या शिबिरात दाखल झाला. विराट कोहलीच्या आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही. आरसीबीच्या या […]