बाचीनजीक शेतवडीत एकावर चाकू हल्ला
बेळगाव : चाकू हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रविवारी सायंकाळी बाची-तुरमुरी दरम्यान शेतवडीत ही घटना घडली असून हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा शोध घेण्यात येत आहे. राजू कडोलकर (वय 53) रा. कामत गल्ली असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व सहकाऱ्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. प्रफुल्ल पाटील व इतर तिघा जणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला आहे याचा तपास सुरू आहे. जखमी व हल्लेखोर या दोघा जणांची पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेसंबंधी पोलीस दलाकडून रात्री उशिरापर्यंत कसलीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. चाकू हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी रवाना झाले असून पोलीस आयुक्तांनी गस्त वाढविण्याची सूचना केली आहे.
Home महत्वाची बातमी बाचीनजीक शेतवडीत एकावर चाकू हल्ला
बाचीनजीक शेतवडीत एकावर चाकू हल्ला
बेळगाव : चाकू हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रविवारी सायंकाळी बाची-तुरमुरी दरम्यान शेतवडीत ही घटना घडली असून हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा शोध घेण्यात येत आहे. राजू कडोलकर (वय 53) रा. कामत गल्ली असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व […]