भांडुप मध्ये मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने चाकूने हल्ला करत आत्महत्याचा प्रयत्न

मुंबईच्या भांडुप परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुप मध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीने महिला मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात येऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि स्वतःचा गळा चिरून घेतला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात …

भांडुप मध्ये मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने चाकूने हल्ला करत आत्महत्याचा प्रयत्न

मुंबईच्या भांडुप परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुप मध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीने महिला मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात येऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि स्वतःचा गळा चिरून घेतला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर हल्ला करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहे. 

पोलिसांनी महिलेची चौकशी रुग्णालयात जाऊन केल्यावर तिने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. काही दिवसांपासून महिलेने आरोपीशी बोलणे बंद केले होते. यावर तो चिडला आणि त्याने महिलेवर चाकूने हल्ला केला. नंतर आरोपीने आत्महत्या करण्याच्या उद्देश्याने स्वतःच्या गळावर चाकू मारून घेतला.महिलेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Edited by – Priya Dixit   

 

Go to Source