कल्याणच्या बॅंकेत आजीच्या पेन्शनच्या पैशावरून नातेवाईकांमध्ये चाकूने हल्ला

कल्याणच्या एका बॅंकेत आजीच्या पेन्शनच्या पैशावरून नातेवाईकांमध्ये चाकूबाजी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजीच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईक एकमेकांशी भिडले आणि एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केला

कल्याणच्या बॅंकेत आजीच्या पेन्शनच्या पैशावरून नातेवाईकांमध्ये चाकूने हल्ला

कल्याणच्या एका बॅंकेत आजीच्या पेन्शनच्या पैशावरून नातेवाईकांमध्ये चाकूबाजी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजीच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईक एकमेकांशी भिडले आणि एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी हल्लेखोर या घटनेननंतर पसार झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मध्ये राहणाऱ्या एक आजी सेवानिवृत्त झाल्या. पेन्शनचे पैसे घेण्यासाठी दोघे भाऊ बँकेत पैसे आणायला गेले. आजीच्या पैशावर आमचा हक्क आहे असं म्हणून दोन्ही गटात जोरदार भांडण सुरु झाले आणि बँकेतच त्यांच्यात वाद सुरु झाला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करत बँकेच्या बाहेर पाठवले. बँकेच्या बाहेर आल्यावर देखील दोन्ही गटात पुन्हा वाद सुरु झाला आणि एका गटातील तिघांनी दुसऱ्या गटातील दोघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून आरोपी पसार झाले.सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाली . 

घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील शोध घेत आहे. 

 Edited by – Priya Dixit   

 

Go to Source