पतंग करणार वीजेचे उत्पादन

जगाची ऊर्जेची आवश्यकता दिवसेंदिवस वाढतच आहे. पारंपरिक मार्गांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती केल्यास वायू प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे वीज निर्मितीचे पर्यावरणस्नेही मार्ग शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. चीन या देशात अशा प्रकारचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. ‘पतंग’ या वस्तूपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग या देशाने यशस्वी केला असून वीजनिर्मिती करणारा पतंग आकाशात सोडलाही आहे. अर्थातच, हा पतंग आपण उडवतो तसा कागदाचा किंवा छोट्या आकाराचा नाही. तर तो महाकाय पतंग आहे. त्याचे क्षेत्रफळ 5 हजार चौरस मीटर इतके आहे. या पतंगाला हलकी आणि छोट्या आकाराची फिरती पाती (टर्बाईन्स) बसविण्यात आली आहेत.
हा पतंग आकाशात उडविला गेल्यानंतर वर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही पाती फिरु लागतात आणि वीजेची निर्मिती होऊ लागते. ही वीज पतंगाला जोडलेल्या तारेतून खाली भूमीवर येते आणि भूमीवर असलेल्या बॅटऱ्यांमध्ये साठते. ही साठरलेली वीज नंतर अनेक कारणांसाठी उपयोगात आणता येते. या वीजेचा उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे, असे संशोधकांचे प्रतिपादन आहे. या पतंगाचे परीक्षण सफल झाल्यामुळे आता त्यातून वीज निर्मिती केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. हा एक अद्भूत प्रयोग असून साऱ्या जगात त्याची चर्चा होत आहे. या पतंगाची निर्मिती ‘चायना एनर्जी इंजिनिअरींग कॉर्पोरेशन’ या कंपनीने केली आहे. विद्युतनिर्मिती करणाऱ्या या पतंगाचा आकार एखाद्या मोठ्या पॅरेशूटसारखा असतो. सध्या या उपकरणातून वीजेचे अल्प उत्पादन होत आहे. तथापि, भविष्यकाळात या उपकरणात सुधारणा करुन व्यापारी तत्वावर वीजनिर्मिती केली जाऊ शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. भारतातही अशा प्रकारे कोणी वीजनिर्मिती केल्यास तो अत्यंत उपयुक्त उपक्रम सिद्ध होऊ शकतो.

Home महत्वाची बातमी पतंग करणार वीजेचे उत्पादन
पतंग करणार वीजेचे उत्पादन
जगाची ऊर्जेची आवश्यकता दिवसेंदिवस वाढतच आहे. पारंपरिक मार्गांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती केल्यास वायू प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे वीज निर्मितीचे पर्यावरणस्नेही मार्ग शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. चीन या देशात अशा प्रकारचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. ‘पतंग’ या वस्तूपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग या देशाने यशस्वी केला असून वीजनिर्मिती करणारा पतंग आकाशात सोडलाही आहे. […]
