कपिलेश्वर मंदिरात किरणोत्सव शिवलिंगाला सूर्यकिरणांचा स्पर्श

बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या कपिलेश्वर मंदिरात किरणोत्सवाला प्रारंभ झाला आहे. होळी पौर्णिमेअगोदर व झाल्यानंतर आठवडाभरात सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर येतात. या काळात विशेष पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात येते. शिवलिंगावर पडणारे सूर्यकिरण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. ज्या भाविकांना किरणोत्सवाची अनुभूती घ्यायची असेल, त्यांनी सकाळी 7 ते 7.15 या वेळेत मंदिरात उपस्थित […]

कपिलेश्वर मंदिरात किरणोत्सव शिवलिंगाला सूर्यकिरणांचा स्पर्श

बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या कपिलेश्वर मंदिरात किरणोत्सवाला प्रारंभ झाला आहे. होळी पौर्णिमेअगोदर व झाल्यानंतर आठवडाभरात सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर येतात. या काळात विशेष पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात येते. शिवलिंगावर पडणारे सूर्यकिरण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. ज्या भाविकांना किरणोत्सवाची अनुभूती घ्यायची असेल, त्यांनी सकाळी 7 ते 7.15 या वेळेत मंदिरात उपस्थित राहून सूर्यकिरणे पाहावीत, असे आवाहन कपिलेश्वर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.