दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित …

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

ALSO READ: अजित पवारांच्या विमान अपघाताचे कारण कमी दृश्यमानता नव्हती का? अनिल देशमुख यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची इच्छा करत असल्याचा दावा विद्या प्रतिष्ठानचे सचिव व खंदे समर्थक किरण गुजर यांनी केला आहे. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांची शेवटची इच्छा होती आणि ती लवकरच पूर्ण होणार. असे संकेत त्यांनी दिले आहे. 

ALSO READ: ‘सहा जणांचा मृत्यू आणि पाच मृतदेह सापडले; सहावा कुठे? अजित पवार विमान अपघात की कट कारस्थान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले

बारामतीत माध्यमांशी संवाद साधताना गुजर म्हणाले की, अजित पवार यांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचा विचार करत होते आणि अशी त्यांची इच्छा देखील होती. 

ALSO READ: माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे.. 10 दिवसांतच मृत्यू, संजय राऊतांनी केले खळबळजनक आरोप

त्यांनी ही शेवटची इच्छा नक्कीच लवकरच पूर्ण होईल आणि दादांचे हे स्वप्न देखील पूर्ण होतील असे संकेत दिले आहे.किरण गुजर यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला अधिकृत अधिष्ठान मिळाले आहे. 

 Edited By – Priya Dixit 

 

Go to Source