11 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘किलर सूप’
मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत
गुणवान अभिनेता मनोज वाजपेयी आता ओटीटी किंग ठरला आहे. द फॅमिली मॅन नंतर आता लवकरच तो प्रेक्षकांदरम्यान पुन्हा ओटीटीवर एक मिस्ट्री थ्रिलर सीरिज ‘किलर सूप’सोबत परतणार आहे. द किलर सूपची एक झलक पाहिल्यापासूनच चाहते अभिनेत्याच्या या सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यावेळी मनोज डबल धमाल करताना दिसून येणार आहे.
या सीरिजमध्ये पहिल्यांदाच मनोज हा कोंकणा सेन शर्मासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. ब्लॅक कॉमेडी मर्डर मिस्ट्रीने भरपूर ही सीरिज निश्चितपणे अखेरपर्यंत हत्येमागील रहस्य कायम ठेवणार असल्याचे मानले जात आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. चौबे यांनी यापूर्वी विद्या बालन आणि नसीरुद्दीन शाह यांच्या ‘इश्कियां’ आणि ‘डेढ इश्कियां’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन यांची ही सीरिज हिंदीसोबत तमिळ-तेलगू आणि कन्नड भाषेत देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. 11 जानेवारी रोजी मनोज वाजपेयीची या वर्षातील पहिली वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.
Home महत्वाची बातमी 11 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘किलर सूप’
11 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘किलर सूप’
मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत गुणवान अभिनेता मनोज वाजपेयी आता ओटीटी किंग ठरला आहे. द फॅमिली मॅन नंतर आता लवकरच तो प्रेक्षकांदरम्यान पुन्हा ओटीटीवर एक मिस्ट्री थ्रिलर सीरिज ‘किलर सूप’सोबत परतणार आहे. द किलर सूपची एक झलक पाहिल्यापासूनच चाहते अभिनेत्याच्या या सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला […]