जीएसटी फसवणूक प्रकरणी प्रमुख संशयितास अटक
डिचोली पोलिसांचे यशस्वी तपासकार्य : जीएसटीचे 75 लाखांची अफरातफर
डिचोली : 13 जानेवारी 2025 रोजी डिचोली पोलिसस्थानकात राज्य कर अधिकारी कार्यालय, डिचोलीतर्फे नोंदविण्यात आलेल्या जीएसटी कर बुडवेगिरी व फसवणूक प्रकरणाचा डिचोली पोलिसांनी यशस्वी तपास लावला आहे. डिचोली निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसपथकाने या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दिनेश पुंजा पाटणी, नवी मुंबई याला मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणात सरकारची जीएसटीच्या स्वरूपात 75 लाख 541 हजार 310 रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, जीएसटी, वाणिज्य कर विभागच्या अधिकारी सोफिया लॉरेन्स ई. वाज यांनी डिचोली पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती.
त्यात 17 ऑगस्ट 2021 रोजी ओमप्रकाश केवट यांच्याविऊद्ध ग्रीन अग्रो इंडस्ट्रीज या व्यापार नावाखाली केंद्रीय जीएसटी कॉमन पोर्टलवर फसवणूक करून नोंदणी मिळवली होती. त्याने व्यवसायाचे मुख्य ठिकाण पर्ये, डिचोली, गोवा, उत्तर गोवा, गोवा, 403505 येथे दाखवले होते. या पोर्टलवर वीज बिल, अमृतराव तनबाराव राणे यांचे पॅन कार्ड कॉपी आणि एनओसी/संमती पत्र आणि त्यांचे छायाचित्र असे बनावट कागदपत्रे अपलोड केली होती. 17 ऑगस्ट 2021 रोजी जीएसटी नोंदणी मिळवणाऱ्या करदात्याने जाणूनबुजून करपात्र पुरवठ्यावर कर भरला नाही. ज्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले, असे म्हटले होते.
या संदर्भात डिचोली पोलिसस्थानकात कलम 420, 469 भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता व तपास सुरू करण्यात आला होता. या तपासादरम्यान तांत्रिक देखरेख ठेवण्यात आली तसेच स्थानिक गुप्तचर यंत्रणा तैनात करण्यात आली. महत्त्वाचे पुरावे आणि महत्त्वाचे दुवे कसून तपासण्यात आले आणि आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिस पथकांना यश आले. दिनेश पुंजा पाटणी (नवी मुंबई, उलवे, वहाळ, रायगड, महाराष्ट्र) याचे नाव समोर आल्यानंतर त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यासाठी डिचोली पोलिसांकडून पावले उचलण्यात आली.
डिचोलीतील पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या देखरेखीखाली एक पथक तयार करण्यात आले. ज्यामध्ये उपनिरीक्षक आकाश परवार, रोहित वरक आणि आकाश पेडणेकर यांचा समावेश होता आणि या पथकाला 9 नोव्हें. रोजी मुंबईला रवाना करण्यात आले होते. पथकाने मुंबईतील उलवे पोलिसस्थानक आणि सीबीडी, बेलापूर पोलिसस्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपासकार्य हाती घेतले. 14 नोव्हें. रोजी, डिचोली पोलिस पथकाने संशयित आरोपी दिनेश पुंजा पटनी (वय 38 वर्षे, रा. नवी मुंबई, उलवे, वहाळ, रायगड, महाराष्ट्र) याला ग्रेट ईस्टर्न चेंबर, बेलापूर, नवी मुंबई येथे शोधून काढला आणि ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीला 14 नोव्हें. रोजी रोजी बेलापूर येथील ज्युनियर सिव्हिल जज कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला 15 नोव्हें. पर्यंत 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली. डिचोलीचे निरीक्षक विजय राणे सरदेसाई आणि उपअधिक्षक श्रीदेवी बी.व्ही. आणि उत्तर गोवा अधिक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली उपनिरीक्षक आकाश परवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
Home महत्वाची बातमी जीएसटी फसवणूक प्रकरणी प्रमुख संशयितास अटक
जीएसटी फसवणूक प्रकरणी प्रमुख संशयितास अटक
डिचोली पोलिसांचे यशस्वी तपासकार्य : जीएसटीचे 75 लाखांची अफरातफर डिचोली : 13 जानेवारी 2025 रोजी डिचोली पोलिसस्थानकात राज्य कर अधिकारी कार्यालय, डिचोलीतर्फे नोंदविण्यात आलेल्या जीएसटी कर बुडवेगिरी व फसवणूक प्रकरणाचा डिचोली पोलिसांनी यशस्वी तपास लावला आहे. डिचोली निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसपथकाने या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दिनेश पुंजा पाटणी, नवी मुंबई याला मुंबई येथून ताब्यात […]
