मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत
अमित ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
ओटवणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शुक्रवारी विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते केतन सावंत यांना देण्यात आले. यावेळी केतन सावंत यांनी जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरणादायी काम करण्यात येणार असून लवकरच विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचे सांगून जिल्ह्यात विद्यार्थी सेना मजबूत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पक्ष निरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे, जिल्हा संपर्क अध्यक्ष महेश परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल केतन सावंत यांचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
Home महत्वाची बातमी मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत
मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत
अमित ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र ओटवणे | प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शुक्रवारी विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते केतन सावंत यांना देण्यात आले. यावेळी केतन सावंत यांनी जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरणादायी काम करण्यात येणार असून लवकरच विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे […]