केरळ युवा काँग्रेस प्रदेशाध्याला अटक

निदर्शनांकरणी झाली कारवाई वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम युवा काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष राहुल मामकुत्तथिल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील महिन्यात युवा काँग्रेसकडून आयोजित सचिवालय मार्चदरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले आहे. तिरुअनंतपुरम छावणी पोलिसांनी मंगळवारी पहाटे राहुल यांना पथानामथिट्टा जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वात राज्य […]

केरळ युवा काँग्रेस प्रदेशाध्याला अटक

निदर्शनांकरणी झाली कारवाई
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
युवा काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष राहुल मामकुत्तथिल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील महिन्यात युवा काँग्रेसकडून आयोजित सचिवालय मार्चदरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले आहे.
तिरुअनंतपुरम छावणी पोलिसांनी मंगळवारी पहाटे राहुल यांना पथानामथिट्टा जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वात राज्य सरकारकडून आयोजित आयोजित केरळ सदा कार्यक्रमादरम्यान युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.
पोलिसांनी हिंसेप्रकरणी विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनाही आरोपी केले आहे. काँग्रेस नेत्यावर 21 डिसेंबर रोजी रॅलीदरम्यान पोलिसांवर हल्ला करणे आणि  सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. काँग्रेसच्या सुमारे 300 कार्यकर्त्यांवर याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.