केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना अटक

स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सीएम हाऊसमध्ये आम आदमी पक्षाच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेले अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांना दुपारी 12.40 वाजता सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. चौकशीनंतर विभव यांना […]

केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना अटक

स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप 
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीएम हाऊसमध्ये आम आदमी पक्षाच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेले अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांना दुपारी 12.40 वाजता सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. चौकशीनंतर विभव यांना तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.
अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी स्वाती मालीवाल 13 मे रोजी सकाळी 9 वाजता सीएम हाऊसमध्ये पोहोचल्या. यादरम्यान विभव कुमारने त्यांना मारहाण करून गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. स्वाती मालीवाल यांनी 16 मे रोजी संध्याकाळी 6.15 वाजता दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल केला होता. 17 मे रोजी दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांची एम्समध्ये वैद्यकीय तपासणी केली. याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून मालीवाल यांच्या डोळ्यांवर आणि पायावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. अहवाल आल्यानंतर काही तासांनी दिल्ली पोलिसांनी सीएम हाऊस गाठत विभव कुमारला अटक केली. दुसरीकडे, घटनेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 32 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांना सीएम हाऊसमधून बाहेर काढताना दिसत आहेत.
वैद्यकीय अहवाल प्राप्त
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन आणि प्राणघातक हल्ला प्रकरणात सर्वांनाच प्रतीक्षा असलेला वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. दिल्ली एम्समधील डॉक्टरांच्या टीमने स्वाती मालीवाल प्रकरणात आपला वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. या अहवालात स्वाती मालीवाल यांच्या उजव्या गालावर, डोळ्याच्या खाली आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. मालीवाल यांनी आपल्या डोक्मयालाही मार लागल्याचे सांगितले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विभवविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये त्याच्याविऊद्ध गंभीर आणि अजामीनपात्र कलमे लावण्यात आली आहेत.
आणखी एक व्हिडिओ समोर
कथित हल्ल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता याप्रकरणी एक नवीन व्हिडिओ समोर आला असून त्यात काही सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांचा हा व्हिडीओ बघितला जात नसल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्ही पॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ 13 मेचा असून त्यादिवशी स्वाती मालीवाल यांच्यावर कथित हल्ला झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी महिला सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांचा हात पकडला असून आप खासदार आपला हात हलवत असल्याचे दिसत आहे.