केजरीवालांनी मांडला विश्वासदर्शक ठराव
दिल्ली विधानसभेत आज होणार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. ‘आप’ने पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे एकजूट दाखवण्यासाठी केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. आता शनिवारी सभागृहाचे कामकाज होणार असून विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे.
‘ऑपरेशन लोटस’मध्ये आमचे आमदार विकत घेण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. आमच्या सात आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीतील मद्य धोरण हा काही घोटाळा नाही. दिल्ली सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाडणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे. घोटाळ्याच्या आरोपाखाली आप नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रयत्नांनाही यश आले नाही. आमचे सर्व आमदार आजही आमच्यासोबत आहेत, असे केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडताना सांगितले.
Home महत्वाची बातमी केजरीवालांनी मांडला विश्वासदर्शक ठराव
केजरीवालांनी मांडला विश्वासदर्शक ठराव
दिल्ली विधानसभेत आज होणार चर्चा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. ‘आप’ने पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे एकजूट दाखवण्यासाठी केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. आता शनिवारी सभागृहाचे कामकाज होणार असून विश्वासदर्शक ठरावावर चर्चा […]