केजरीवालांना ईडीकडून पुन्हा दोन समन्स जारी

जल बोर्ड प्रकरणात आज, मद्य धोरणप्रकरणी गुरुवारी चौकशी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दोन नवीन समन्स प्राप्त झाले आहेत. पहिले समन्स दिल्ली जल बोर्ड लाचखोरी प्रकरणाशी संबंधित असून दुसरे मद्य धोरण प्रकरणात आहे. या समन्सनुसार केजरीवाल यांना सोमवार, 18 मार्च रोजी दिल्ली जल बोर्ड प्रकरणात आणि गुऊवार, 21 […]

केजरीवालांना ईडीकडून पुन्हा दोन समन्स जारी

जल बोर्ड प्रकरणात आज, मद्य धोरणप्रकरणी गुरुवारी चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दोन नवीन समन्स प्राप्त झाले आहेत. पहिले समन्स दिल्ली जल बोर्ड लाचखोरी प्रकरणाशी संबंधित असून दुसरे मद्य धोरण प्रकरणात आहे. या समन्सनुसार केजरीवाल यांना सोमवार, 18 मार्च रोजी दिल्ली जल बोर्ड प्रकरणात आणि गुऊवार, 21 मार्च रोजी मद्य धोरण प्रकरणात तपास यंत्रणांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अलीकडेच दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता यांना अटक झाली आहे.
आतापर्यंत केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणातील आठ समन्स बेकायदेशीर ठरवून त्याकडे लक्ष दिलेले नाही. तसेच चौकशीतही भाग घेतलेला नाही. याचदरम्यान शनिवारी दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या समन्सवर चौकशीसाठी हजर न राहिल्याप्रकरणी जामीन मंजूर केला होता. आता नव्या समन्सना केजरीवाल दाद देतात की नाहीत हे त्या-त्या तारखांनाच स्पष्ट होणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांनंतर समन्स प्राप्त झाले. त्यावर त्यांनी भाजपवर आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केल्याचा आरोप केला. तसेच वारंवार प्राप्त होत असलेल्या समन्समुळे केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांनी पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दिल्ली जल बोर्ड प्रकरण कशाबद्दल आहे हे कोणालाच माहीत नाही. असे असतानाही केजरीवाल यांना कसे तरी अटक करून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्याची ही एक बॅकअप योजना दिसते’, असा दावा आतिशी यांनी केला आहे.
भाजपच्या एका नेत्याने आम आदमी पक्षाला समन्सच्या मुद्यावरून फटकारले आहे. केजरीवाल कायद्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी तपास यंत्रणांनी विचारलेल्या प्रŽांची उत्तरे द्यावीत, असे दिल्ली भाजपचे नेते हरीश खुराना म्हणाले. ‘ईडीने कायद्यानुसार समन्स जारी केले आहेत, पण दिल्लीचे मुख्यमंत्री त्यापासून पळ काढत आहेत. यामागील कारणे त्यांनाच माहीत असतील’, असे त्यांनी स्पष्ट केले.