कविता यांना 3 दिवस सीबीआय कोठडी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मद्य घोटाळा प्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कविता आधीच तिहार तुऊंगात बंद आहे. मद्य धोरण प्रकरणात बीआरएस नेत्या कविता हा महत्त्वाचा भाग असल्याचे सीबीआयचे मत आहे. या प्रकरणाचा टप्प्याटप्प्याने तपास करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे पाच दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सध्या त्यांना केवळ 15 एप्रिलपर्यंत तीन दिवसांची कोठडी देण्यात आली.
दिल्ली मद्य घोटाळ्यात आम आदमी पार्टीला 100 कोटी ऊपयांची लाच देण्याची व्यवस्था करण्यात के. कविता यांचाही सहभाग असल्याचा युक्तिवाद सीबीआयच्यावतीने करण्यात आला. दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये हा व्यवहार झाला होता. या व्यवहारादरम्यान एका मोठ्या व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत त्यांना मद्य धोरणाला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा केल्याचा दावाही करण्यात आला. बीआरएस नेत्या कविता यांनी सरथचंद्र रे•ाr यांना मद्य धोरणावर चर्चेसाठी पुढे केले होते. अभिषेक बोईनपल्ली यांनी विजय नायरला 100 कोटी ऊपये दिल्याचे सांगितले होते, असे वक्तव्य दिनेश अरोरा यांनी केले आहे. सीबीआयने आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांच्या वक्तव्याचा हवाला दिला.
Home महत्वाची बातमी कविता यांना 3 दिवस सीबीआय कोठडी
कविता यांना 3 दिवस सीबीआय कोठडी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कविता आधीच तिहार तुऊंगात बंद आहे. मद्य धोरण प्रकरणात बीआरएस नेत्या कविता हा महत्त्वाचा भाग असल्याचे सीबीआयचे मत आहे. या प्रकरणाचा टप्प्याटप्प्याने तपास […]