कौर, शेफालीच्या मानांकनात सुधारणा

वृत्तसंस्था/दुबई नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकनात यादीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आणि शेफाली वर्मा यांनी संयुक्त 11 वे स्थान मिळविले आहे. उपकर्णधार स्मृती मानधनाने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. या मानांकन यादीत हरमनप्रितचे स्थान एका अंकाने वधारले. तर शेफालीचे स्थान चार अंकाने वधारले. टी-20 फलंदाजांच्या मानांकनातील पहिल्या 20 […]

कौर, शेफालीच्या मानांकनात सुधारणा

वृत्तसंस्था/दुबई
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकनात यादीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आणि शेफाली वर्मा यांनी संयुक्त 11 वे स्थान मिळविले आहे. उपकर्णधार स्मृती मानधनाने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे.
या मानांकन यादीत हरमनप्रितचे स्थान एका अंकाने वधारले. तर शेफालीचे स्थान चार अंकाने वधारले. टी-20 फलंदाजांच्या मानांकनातील पहिल्या 20 खेळाडूंमध्ये भारताच्या चार खेळाडूंचा सामावेश आहे. या यादीत भारताची रिचा घोष 24 व्या स्थानावर आहे. बेथ मुनी 769 गुणासह पहिल्या स्थानावर आहे तर गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या दिप्ती शर्माने तिसरे स्थान तसेच रेणूकासिंग ठाकुरने नववे, राधा यादवने 20 वे स्थान मिळविले आहे. इंग्लंडची इक्लेस्टोन पहिल्या स्थानावर आहे.