कट्टा व्यापारी संघाचा आज स्नेहमेळावा

कट्टा / वार्ताहर कट्टा व्यापारी संघ तालुका मालवण यांचा स्नेहमेळावा आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 7.30 वाजता भक्ती मंगल कार्यालय कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यात अन्नसुरक्षा व्यवसाय कर व अन्य व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कट्टा पंचक्रोशीतील सर्व व्यापारी वर्गाने या स्नेहमेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन […]

कट्टा व्यापारी संघाचा आज स्नेहमेळावा

कट्टा / वार्ताहर
कट्टा व्यापारी संघ तालुका मालवण यांचा स्नेहमेळावा आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 7.30 वाजता भक्ती मंगल कार्यालय कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यात अन्नसुरक्षा व्यवसाय कर व अन्य व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कट्टा पंचक्रोशीतील सर्व व्यापारी वर्गाने या स्नेहमेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन कट्टा व्यापारी संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.