कास्पर रुड अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ जिनिव्हा एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडने एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत झेकच्या टॉमस मॅकहेकने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला अनपेक्षित पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात कास्पर रुडने इटलीच्या कोबोलीचा 1-6, 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश […]

कास्पर रुड अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ जिनिव्हा
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडने एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत झेकच्या टॉमस मॅकहेकने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला अनपेक्षित पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात कास्पर रुडने इटलीच्या कोबोलीचा 1-6, 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता रुड आणि झेकचा टॉमस मॅकहेक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात झेकच्या 44 व्या मानांकित मॅकहेकने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचचे आव्हान 4-6, 6-0, 6-1 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत जोकोविचला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. या पराभवाच्या धक्क्यामुळे आता पॅरिसमध्ये रविवारपासून सुरु होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जोकोविचला आपले विजेतेपद राखण्यासाठी खरी कसरत करावी लागेल. जिनिव्हातील या स्पर्धेत 1987 नंतर अंतिम फेरी गाठणारा टॉमस मॅकहेक हा झेकचा पहिला टेनिसपटू आहे. 1987 साली झेकच्या टॉमस स्मिडने या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.