शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे लवकर काढा; नाहीतर तालुक्यातील कासारी व भोगावतीला पूर परिस्थिती गंभीर

उत्रे/ प्रतिनिधी शिंगणापूर ते चिखली या दरम्यान पंचगंगा नदीवर उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेने या बंधाऱ्याचे बरगे काढणे अपेक्षित होते. मात्र या बंधाऱ्याचे बरगे काढलेले नाहीत.परिणामी कासारी व भोगावती नदीची पाणी पातळी वाढून पूरपरिस्थिती गंभीर होण्याची होऊन नदीकाठच्या शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होणार आहे. तरी या बांधऱ्याचे बरगे […]

शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे लवकर काढा; नाहीतर तालुक्यातील कासारी व भोगावतीला पूर परिस्थिती गंभीर

उत्रे/ प्रतिनिधी

शिंगणापूर ते चिखली या दरम्यान पंचगंगा नदीवर उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेने या बंधाऱ्याचे बरगे काढणे अपेक्षित होते. मात्र या बंधाऱ्याचे बरगे काढलेले नाहीत.परिणामी कासारी व भोगावती नदीची पाणी पातळी वाढून पूरपरिस्थिती गंभीर होण्याची होऊन नदीकाठच्या शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होणार आहे. तरी या बांधऱ्याचे बरगे महानगरपालिकेने त्वरित काढावेत अशी मागणी होत आहे.
या बंधाऱ्या नजीक कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा उपसाकेंद्र आहे यामुळे बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेकडे आहे. या बंधाऱ्याचे बरगे महानगरपालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी न काढल्यामुळे कासारी व भोगावती नदीच्या पुराचे पाणी निचरा होण्याच्या गतीवर परिणाम होतो. पश्चिम पन्हाळा भागात थोडा जरी पाऊस पडला तरीही पुराचे पाणी लगेचच पात्राबाहेर पडते . महापुराचे पाणी जलद गतीने ओसरण्यावर बंधाऱ्याचे हे बरगे अडथळा निर्माण करतात. यामुळे कासारी व भोगावती नदीकाठच्या सखल भागात पाणी साचून रहाते . लवकर पुराचे पाणी ओसरत नाही. परिणामी पन्हाळा तालुक्यातील कासारी व भोगावती तीरावरील अनेक गावच्या शेकडो एकर ऊसशेतीला फटका बसणार आहे . तसेच महापुरच्या प्रवाहात हा बंधारा वाहून जाऊ शकतो. तरी महानगरपालिकेने पुढील धोका ओळखून शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे वेळेत काढणे आवश्यक असतांना मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.