‘प्रवाह’ मुळे कर्नाटकचे ‘पितळ’ पडणार उघडे!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
पणजी : म्हादईप्रश्नी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘प्रवाह’ने आपली पाहणी पूर्ण केल्यानंतर सत्य उजेडात येईल आणि कर्नाटकचे पितळ उघडे पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. म्हादई संबंधीच्या प्रवाह प्राधिकरणाचे पथक 7 जुलै रोजी कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकाने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार आहे. गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकाने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य उघड होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे. प्रत्यक्षात प्रवाहचे पथक 4 जुलैपासून महाराष्ट्रातून नदीच्या पात्राची पाहणी करणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार आता रविवार दि. 7 जुलैपासून पाहणी करण्यात येणार आहे.
ही पाहणी दोन दिवस चालणार आहे. गोव्यातील पाहणीनंतर हे पथक महाराष्ट्र व कर्नाटकातील भागांची पाहणी करेल. त्यानंतर 8 जुलै रोजी समितीची दुसरी बैठक बेंगळूर येथे होणार आहे. नव्या नियोजित वेळापत्रकानुसार हे पथक दि. 7 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘हलतरा’ नाल्यास भेट देणार आहे. त्यानंतर 10.30 वा. कणकुंबीमार्गे जाऊन 11 वा. कळसा नाल्याची पाहणी करील. त्याचवेळी कोटनी धरण स्थळ व नेर्से येथील भांडुरा नाल्याचीही पाहणी करण्यात येईल. तेथून बेळगाव येथे रात्री मुक्काम करुन व दुसऱ्या दिवशी हवाईमार्गे बेंगळूरसाठी प्रस्थान करेल. तेथे समितीची दुसरी बैठक होईल.
Home महत्वाची बातमी ‘प्रवाह’ मुळे कर्नाटकचे ‘पितळ’ पडणार उघडे!
‘प्रवाह’ मुळे कर्नाटकचे ‘पितळ’ पडणार उघडे!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास पणजी : म्हादईप्रश्नी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘प्रवाह’ने आपली पाहणी पूर्ण केल्यानंतर सत्य उजेडात येईल आणि कर्नाटकचे पितळ उघडे पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. म्हादई संबंधीच्या प्रवाह प्राधिकरणाचे पथक 7 जुलै रोजी कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकाने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार आहे. गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून […]