कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉ. सोनाली सरनोबत

बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सोनाली सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे राज्याध्यक्ष एस. सुरेशराव साठे, कोषाध्यक्ष टी. आर. व्यंकटराव चव्हाण यांच्या हस्ते बेंगळूर येथे डॉ. सरनोबत यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील चव्हाण, कार्यालय व्यवस्थापक श्रीनिवास मगर व बेंगळूर शहर उपाध्यक्ष एस. […]

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉ. सोनाली सरनोबत

बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सोनाली सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे राज्याध्यक्ष एस. सुरेशराव साठे, कोषाध्यक्ष टी. आर. व्यंकटराव चव्हाण यांच्या हस्ते बेंगळूर येथे डॉ. सरनोबत यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील चव्हाण, कार्यालय व्यवस्थापक श्रीनिवास मगर व बेंगळूर शहर उपाध्यक्ष एस. रोहीतराव साठे उपस्थित होते. कर्नाटक क्षत्रिक मराठा परिषद ही कर्नाटकातील मराठा समाजासाठी बेंगळूर येथे स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र विशेष युनिट असून डॉ. सोनाली या कर्नाटकातील पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अनिल बेनके व उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. यावेळी सोनाली यांनी मराठा शिक्षण, उन्नती व विकास यासाठी आपण सदैव कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली व बेळगावमधील मराठा महिलांचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे, असे त्या म्हणाल्या.