कर्जत तिहेरी हत्याकांडाने हादरले

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चिकणपाड्यात रविवारी एका नाल्यातून एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह मिळाल्याने कर्जत हादरले आहे.या मृतदेहात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या प्रसंगी कर्जत मध्ये एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलाची हत्या …

कर्जत तिहेरी हत्याकांडाने हादरले

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चिकणपाड्यात रविवारी एका नाल्यातून एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह मिळाल्याने कर्जत हादरले आहे.या मृतदेहात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. 

गणेशोत्सवाच्या प्रसंगी कर्जत मध्ये एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली असून तिघांचे मृतदेह नाल्यातून वाहत आले. 

सदर घटना रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील चिकणपाड्यात रविवारी घडली आहे. सकाळी दशक्रिया सुरु असताना नऊ वाजेच्या सुमारास नाल्यात एका मुलाचे मृतदेह सापडले. हे बघतातच सर्वांना धक्का बसला तेवढ्यात दोन प्रेत अजून आढळली. मदन जैतू पाटील, अनिशा आतील, आणि विवेक पाटील असे या मृतांची नावे आहेत.सर्वांच्या अंगावर जखमांचे व्रण आढळले आहे.  हे सर्व कळम्ब बोरगावातील होते. गेल्या 15 वर्षांपासून चिकणपाड्यात वास्तव्यास होते. 

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या कोणी आणि कशाला केली अद्याप हे समजू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा शोध लावत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नेरळ पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून तपास सुरु केला आहे. 

Edited by – Priya Dixit

 

Go to Source