कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियम येथे सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील विजेत्या रोशनी बामणे सुवर्ण, माही कंग्राळकर सुवर्ण, आर्या काकतीकर रौप्य, ओमेश्वरी कवळे रौप्य, गणेश पाटील कांस्य, प्रज्वल पाटील कांस्य, सुदर्शन बेळगावकर कांस्य. वरील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून अब्दुलरजाक मुल्ला, टीम प्रशिक्षक निलेश गुरखा व ऋतीक लाड, तसेच संघ संयोजिका म्हणून नंदिनी गावडे यांनी कार्यभार सांभाळला. वरील सर्व विजेत्या कराटेपटूंना गजेंद्र काकतीकर, खजिनदार दीपक काकतीकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियम येथे सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील विजेत्या रोशनी बामणे सुवर्ण, माही कंग्राळकर सुवर्ण, आर्या काकतीकर रौप्य, ओमेश्वरी कवळे रौप्य, गणेश पाटील कांस्य, प्रज्वल […]
