लक्ष्मीदेवी यात्रेसाठी करंबळ गाव सज्ज

वार्ताहर /नंदगड करंबळ येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 19 वर्षानंतर बुधवार दि. 28 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी करंबळसह जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल ही पाचही गावे सज्ज झाली आहेत. करंबळ येथील लक्ष्मीदेवी यात्रोत्सवात करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या गावांचा समावेश आहे. करंबळ येथे श्री लक्ष्मीदेवी मंदिर व गदगा आहे. त्यामुळे यात्रोत्सव करंबळ येथे […]

लक्ष्मीदेवी यात्रेसाठी करंबळ गाव सज्ज

वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 19 वर्षानंतर बुधवार दि. 28 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी करंबळसह जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल ही पाचही गावे सज्ज झाली आहेत. करंबळ येथील लक्ष्मीदेवी यात्रोत्सवात करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या गावांचा समावेश आहे. करंबळ येथे श्री लक्ष्मीदेवी मंदिर व गदगा आहे. त्यामुळे यात्रोत्सव करंबळ येथे होणार आहे. यात्रेनिमित्त श्री लक्ष्मीदेवी मंदिर सजविण्यात आले आहे. तर गदगेवर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. यात्रास्थळी वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे 7 वा. देवीचा विवाह सोहळा होणार असल्याने मंदिराभोवती मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती राहणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व स्वयंसेवकांची चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मीदेवीच्या लग्नसोहळ्यासाठी माहेरवासिनी, पै पाहुणे, कामानिमित्त परगावी राहणारे दोन दिवसापूर्वीच दाखल झाले आहेत. खासगी वाहनाने येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.