करंबळ लक्ष्मी यात्रेची आज सांगता
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील लक्ष्मी यात्रा गेल्या आठवडाभर धामधुमीत सुरू आहे. यात्रोत्सव काळात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे रोजच गावात पै पाहुणे व भाविकांची मोठी वर्दळ दिसून येत होती. करंबळ लक्ष्मी यात्रा बुधवार दि. 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. आज गुरुवार दि. 7 रोजी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यानच्या काळात देवीचा विवाह सोहळा, मिरवणूक, गदगेवर स्थापना, विविध धार्मिक कार्यक्रम, आंबील गाडे, रोज रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. पहाटे 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दर्शनानंतर पै-पाहुणे, मित्रपरिवार यांनी आपापल्या नातलगांच्या घरी भेट दिली. त्यामुळे प्रत्येक घर लोकांनी भरून गेले होते. लोकांच्या सेवेसाठी प्रत्येक घरासमोर, पाठीमागे, स्लॅबवर मंडप घालण्यात आले होते. यात्रेच्या निमित्ताने कित्येक वर्षापासून एकमेकांच्या गाठीभेटी होत होत्या. यात्रेच्या निमित्ताने लहान मुलांनी मनोरंजनाचा आस्वाद लुटला. 18 वर्षानंतर भरलेल्या यात्रेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गुरुवार दि. 7 रोजी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 4 वाजता लक्ष्मी देवीच्या मूर्तीला गदगेवरून खाली घेऊन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6 नंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. देवीला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार आहेत.
Home महत्वाची बातमी करंबळ लक्ष्मी यात्रेची आज सांगता
करंबळ लक्ष्मी यात्रेची आज सांगता
वार्ताहर /नंदगड करंबळ येथील लक्ष्मी यात्रा गेल्या आठवडाभर धामधुमीत सुरू आहे. यात्रोत्सव काळात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे रोजच गावात पै पाहुणे व भाविकांची मोठी वर्दळ दिसून येत होती. करंबळ लक्ष्मी यात्रा बुधवार दि. 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. आज गुरुवार दि. 7 रोजी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यानच्या काळात देवीचा विवाह सोहळा, मिरवणूक, […]