कन्नड अभिनेते द्वारकीश यांचे निधन
बेंगळूर : कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेते, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक बंगले शामराव द्वारकानाथ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 81 वर्षांचे होते. ते द्वारकीश या नावानेच सर्वपरिचित होते. बुधवारी सकाळी त्यांच्यावर बेंगळुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे असा परिवार आहे. द्वारकीश यांच्या निधनामुळे शनिवारी कन्नड सिनेसृष्टीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
Home महत्वाची बातमी कन्नड अभिनेते द्वारकीश यांचे निधन
कन्नड अभिनेते द्वारकीश यांचे निधन
बेंगळूर : कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेते, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक बंगले शामराव द्वारकानाथ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 81 वर्षांचे होते. ते द्वारकीश या नावानेच सर्वपरिचित होते. बुधवारी सकाळी त्यांच्यावर बेंगळुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे असा परिवार आहे. द्वारकीश यांच्या निधनामुळे शनिवारी कन्नड सिनेसृष्टीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय […]
