पार्टीसाठी पैसे न दिल्याने कणबर्गीतील तरुणाची आत्महत्या
बेळगाव : 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आईने पैसे दिले नाहीत म्हणून कणबर्गी येथील एका तरुणाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सिदराई अडव्याप्पा शिगीहळ्ळी (वय 25) रा. गोकाक रोड, कणबर्गी असे त्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सिदराईने झाडाला फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार रविवारी रात्री 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी सिदराईने आपल्या आईकडे दहा हजार रुपये मागितले होते. आपल्याजवळ इतका पैसा नाही, असे आईने सांगितल्यानंतर राग अनावर होऊन रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या घरातून बाहेर पडला. थेट त्याने शेत गाठून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी पार्टीसाठी पैसे न दिल्याने कणबर्गीतील तरुणाची आत्महत्या
पार्टीसाठी पैसे न दिल्याने कणबर्गीतील तरुणाची आत्महत्या
बेळगाव : 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आईने पैसे दिले नाहीत म्हणून कणबर्गी येथील एका तरुणाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सिदराई अडव्याप्पा शिगीहळ्ळी (वय 25) रा. गोकाक रोड, कणबर्गी असे त्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सिदराईने झाडाला फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे […]
