गोवा पुस्तक महोत्सवाला कळसूलकरच्या विद्यार्थ्यांची भेट
सावंतवाडी : गोवा पुस्तक महोत्सवानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सौजन्याने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना पुस्तक प्रदर्शन व विक्री महोत्सवास भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत विविध प्रकारची पुस्तके पाहिली तसेच वाचनाविषयीची आवड अधिक वृद्धिंगत केली.यावेळी विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटरलाही भेट दिली. येथे त्यांनी विज्ञानाच्या विविध संकल्पना जाणून घेतल्या, तारांगणातील थ्री-डी शो पाहिला तसेच सायन्स सेंटरमधील विविध विभागांची माहिती घेत विज्ञानाविषयीचे कुतूहल ताजेतवाने केले.या शैक्षणिक उपक्रमादरम्यान प्रशालेचे ग्रंथपाल सतीश राऊळ, सहाय्यक शिक्षिका समृद्धी सामंत, प्रतिक्षा परब, सहाय्यक शिक्षक गोपाळ गवस, पी.बी.बागुल तसेच लोकमान्य मल्टीपर्पजचे अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्यावतीने लोकमान्य परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Home महत्वाची बातमी गोवा पुस्तक महोत्सवाला कळसूलकरच्या विद्यार्थ्यांची भेट
गोवा पुस्तक महोत्सवाला कळसूलकरच्या विद्यार्थ्यांची भेट
सावंतवाडी : गोवा पुस्तक महोत्सवानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सौजन्याने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना पुस्तक प्रदर्शन व विक्री महोत्सवास भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत विविध प्रकारची पुस्तके पाहिली तसेच वाचनाविषयीची आवड अधिक वृद्धिंगत केली.यावेळी विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटरलाही भेट दिली. येथे त्यांनी विज्ञानाच्या […]


