काळम्मावाडी धरण ७० टक्के भरले! धरण क्षेत्रात अतिवृष्टी ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नदीपात्रात १६०० क्युसेक्स पाणी सोडणार !
सरवडे प्रतिनिधी
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरण ७०टक्के भरले असून आज रोजी पाण्याने सरासरी पाणी गाठलेली आहे.
जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद(क्यूसेक्स) पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दूधगंगा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
