Samrajit Ghatge | राज्यातील उच्चांकी निकाल कागलचा असेल ; राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास
समरजित घाटगे यांनी शिंदेवाडी मतदान केंद्रावर केले मतदान
शिंदेवाडी : शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघासाठी शिंदेवाडी येथील बुध नंबर सत्तावीसवर मतदानाचा हक्क बजाविला.यावेळी राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनीही या ठिकाणी मतदानाचा हक्क बजाविला.त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील कसबा सांगाव ,मौजे सांगाव,सिद्धनेर्ली,म्हाकवे,बिद्री बोरवडे,निढोरी,खडकेवाडा,नानीबाई चिखली,सेनापती कापशी,माद्याळ,गिजवणे व कडगाव येथे मतदान केंद्रांना भेटी दिल्या.उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने कागल नगरपालिकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकत्र लढविलेल्या या निवडणुकीत आमच्या युतीचा एकतर्फी विजय झाला.या यशानंतर आता यामध्ये माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीस सामोरे जात आहोत.प्रचारासह आज मतदानाच्या निमित्ताने विविध विभागात कार्यकर्ते व मतदारांची भेट घेतली असता आम्ही तीन काम करणारे नेते एकत्र आल्यामुळे कागलच्या विकासासाठी आमच्या युतीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसले.
आमचे सर्व उमेदवार कामाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेशी पोहोचणारे आहेत.शिवाय आम्ही तीनही नेते नागरिकांच्या अडचणीच्या काळात उभे राहून काम करणारे आहोत. कागलच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार आहोत.कागल नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आमचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
Home महत्वाची बातमी Samrajit Ghatge | राज्यातील उच्चांकी निकाल कागलचा असेल ; राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास
Samrajit Ghatge | राज्यातील उच्चांकी निकाल कागलचा असेल ; राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास
समरजित घाटगे यांनी शिंदेवाडी मतदान केंद्रावर केले मतदान शिंदेवाडी : शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघासाठी शिंदेवाडी येथील बुध नंबर सत्तावीसवर मतदानाचा हक्क बजाविला.यावेळी राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनीही या ठिकाणी मतदानाचा हक्क बजाविला.त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील […]
