कडोलीच्या प्रथमेश डोंगरेची गोवा क्रिकेट संघात निवड
वार्ताहर /कडोली
बीसीसीआय पुरस्कृत कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा येथील सांगे क्रिकेट मैदानावर राजस्थान विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात गोवा संघाकडून कडोली गावचा प्रथमेश चंद्रकांत डेंगरेची संघात निवड करण्यात आली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने सराव सामन्यातून 30 संभाव्य खेळाडूंची निवड केली होती. त्यानंतर या खेळाडूंची कोच स्वप्निल असनोडकर, शदाब जकाती व शैलेंद्र शेणगार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या सराव सामन्यातील उत्तम कामगिरी पाहून गोवा राज्य क्रिकेट संघासाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथमेश चंद्रकांत डोंगरेची निवड करण्यात आली. कुस्तीमध्ये कर्नाटक केसरी मिळविलेले चंद्रकांत गंगाराम डोंगरे यांचा तो मुलगा असून प्रथमेशचे कडोली परिसरातून अभिनंदन होत आहे. कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेतील क्रिकेट सामना दि. 18 ते 21 फेब्रुवारीपर्यंत चार दिवशीय क्रिकेट गोवा येथील सांगे क्रिकेट मैदानावर राजस्थान विरूध्द गोवा यांच्यात खेळविला जात आहे. हा येथील शेवटचा सामना आहे. असून गोवा संघाच्यावतीने प्रथमेश खेळत आहे.
Home महत्वाची बातमी कडोलीच्या प्रथमेश डोंगरेची गोवा क्रिकेट संघात निवड
कडोलीच्या प्रथमेश डोंगरेची गोवा क्रिकेट संघात निवड
वार्ताहर /कडोली बीसीसीआय पुरस्कृत कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा येथील सांगे क्रिकेट मैदानावर राजस्थान विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात गोवा संघाकडून कडोली गावचा प्रथमेश चंद्रकांत डेंगरेची संघात निवड करण्यात आली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने सराव सामन्यातून 30 संभाव्य खेळाडूंची निवड केली होती. त्यानंतर या खेळाडूंची कोच स्वप्निल असनोडकर, शदाब जकाती व […]
