कनिष्ठ महिला हॉकी संघाचा स्थानिक क्लबवर विजय

वृत्तसंस्था/ ब्रेडा, नेदरलँड्स हिना बानो व कनिका सिवाच यांनी नोंदवलेल्या गोलांच्या बळावर भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने युरोप दौऱ्याची विजयी सुरुवात करताना नेदरलँड्सच्या क्लब ब्रेडासे हॉकी व्हेरेनिजिंग पुश यांच्यावर 2-0 अशी मात केली. पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना आजमावून पाहण्याचा प्रयत्न केल्याने गोलफलक कोराच राहिला होता. पण नंतर ही कोंडी भारताने प्रथम फोडताना हिनाने पहिले यश […]

कनिष्ठ महिला हॉकी संघाचा स्थानिक क्लबवर विजय

वृत्तसंस्था/ ब्रेडा, नेदरलँड्स
हिना बानो व कनिका सिवाच यांनी नोंदवलेल्या गोलांच्या बळावर भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने युरोप दौऱ्याची विजयी सुरुवात करताना नेदरलँड्सच्या क्लब ब्रेडासे हॉकी व्हेरेनिजिंग पुश यांच्यावर 2-0 अशी मात केली.
पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना आजमावून पाहण्याचा प्रयत्न केल्याने गोलफलक कोराच राहिला होता. पण नंतर ही कोंडी भारताने प्रथम फोडताना हिनाने पहिले यश मिळविले. दुसऱ्या सत्रात तीन पेनल्टी कॉर्नर वाया घालविल्यानंतर तिसऱ्या सत्रात हिनो पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. ब्रेडासे हॉकी व्हेरेनिजिंगने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण तीन पेनल्टी कॉर्नर मिळवूनही त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही.
चौथ्या सत्रात कनिका सिवाचने दुसरा गोल नोंदवून भारताची आघाडी वाढविली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखण्यासाठी भारतीयांनी व्हेरेनिंग क्लबच्या अनेक आक्रमक चाली उत्कृष्ट बचाव करीत फोल ठरविल्या. भारतीय कनिष्ठ संघाचा दुसरा सामना ब्र्रेडा येथेच बेल्जियमविरुद्ध होणार आहे.