जेएसडब्ल्यू समूहाचा पेंट व्यवसाय नफ्यात
आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 5000 कोटींच्या विक्रीचे ध्येय निश्चित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2023-24 या आर्थिक वर्षासाठी ब्लू पेंट्स (जेएसडब्लू पेंट) चे परिचालन उत्पन्न 2,000 कोटींच्या पुढे गेले आहे. यासह, कंपनीने आपल्या स्थापनेच्या पाच वर्षांत पहिला ऑपरेटिंग नफा नोंदविला आहे.
कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदरेसन एएस म्हणाले, ‘जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ कंपन्यांचे पुढील दोन वर्षांत 5,000 कोटी रुपयांचा महसूल गाठण्याचे लक्ष्य आहे. कंपनी या व्यवसाय विभागात आपली उपस्थिती वाढवत आहे आणि औद्योगिक कोटिंग व्यवसायात अधिक उत्पादने सादर करत आहे.’
सुंदरसन यांनी सांगितले की, ‘आम्ही 2023-24 या आर्थिक वर्षात फायदेशीर स्थितीत पोहोचू शकलो आहोत. जेएसडब्लू पेंट्स ही झपाट्याने वाढणाऱ्या भारतीय पेंट उद्योगातील नवीन कंपन्यांपैकी एक आहे. बाजाराच्या तुलनेत खूप वेगाने वाढ हे त्याचे ध्येय आहे’.
बाजाराच्या वाढीच्या दराच्या तुलनेत पाच ते 10 पट वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. चालू वर्षात (आर्थिक वर्ष 2023-24), आम्ही उर्वरित उद्योगांच्या तुलनेत 10 पट वाढ केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जेएसडब्ल्यू पेंट्सचे पुढील दोन वर्षांत 5,000 कोटी रुपयांचे महसूल लक्ष्याबाबत विचारले असता, सुंदरसन म्हणाले, ‘आम्हाला विश्वास आहे की सदरचे उद्दिष्ट सहज शक्य आहे. सध्या, जेएसडब्ल्यू पेंट्सचे देशभरात 6,000 किरकोळ विक्रेते आहेत. दरवर्षी 2,000 ते 2,500 किरकोळ विक्रेत्यांची भर घालत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Home महत्वाची बातमी जेएसडब्ल्यू समूहाचा पेंट व्यवसाय नफ्यात
जेएसडब्ल्यू समूहाचा पेंट व्यवसाय नफ्यात
आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 5000 कोटींच्या विक्रीचे ध्येय निश्चित वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ब्लू पेंट्स (जेएसडब्लू पेंट) चे परिचालन उत्पन्न 2,000 कोटींच्या पुढे गेले आहे. यासह, कंपनीने आपल्या स्थापनेच्या पाच वर्षांत पहिला ऑपरेटिंग नफा नोंदविला आहे. कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदरेसन एएस म्हणाले, ‘जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ […]