जेएसडब्ल्यू सिमेंट नव्या युनिटसाठी 3,000 कोटींची करणार गुंतवणूक

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात सिमेंट प्रकल्प उभारण्याच्या तयारीत कंपनी नवी दिल्ली : जेएसडब्ल्यू सिमेंट राजस्थानच्या नागौर जिह्यात 3,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन सिमेंट प्रकल्प उभारणार आहे. कारखान्यात वार्षिक 3.30 दशलक्ष टन क्लिंकरची क्षमता असलेले केंद्र देखील राहणार आहे. क्लिंकर सिमेंट हा सिमेंट बनवण्याचा मुख्य घटक आहे. याशिवाय कारखान्यात 18 मेगावॅट वीज निर्मिती युनिटही बसविण्यात येणार आहे. […]

जेएसडब्ल्यू सिमेंट नव्या युनिटसाठी 3,000 कोटींची करणार गुंतवणूक

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात सिमेंट प्रकल्प उभारण्याच्या तयारीत कंपनी
नवी दिल्ली :
जेएसडब्ल्यू सिमेंट राजस्थानच्या नागौर जिह्यात 3,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन सिमेंट प्रकल्प उभारणार आहे. कारखान्यात वार्षिक 3.30 दशलक्ष टन क्लिंकरची क्षमता असलेले केंद्र देखील राहणार आहे. क्लिंकर सिमेंट हा सिमेंट बनवण्याचा मुख्य घटक आहे. याशिवाय कारखान्यात 18 मेगावॅट वीज निर्मिती युनिटही बसविण्यात येणार आहे.
कंपनी स्वत:च्या गुंतवणुकीतून आणि बँकांच्या कर्जातून हा कारखाना उभारण्यासाठी 3,000 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीला सरकारी विभागांकडून काही मंजुरी मिळालेल्या नाहीत आणि उर्वरित कामे लवकरच होणे अपेक्षित आहे. हा नवीन प्रकल्प जेएसडब्ल्यू सिमेंटला उत्तर भारतीय सिमेंट बाजारात प्रवेश करण्यास मदत करेल. तसेच या कारखान्यामुळे 1000 हून अधिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणतात की ‘राजस्थानमधील सिमेंट व्यवसाय क्षेत्रात कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यासह, पुढील काही वर्षांमध्ये, जेएसडब्ल्यू सिमेंट संपूर्ण भारतात आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सारख्या उत्तर भारतीय राज्यांमध्ये वेगाने वाढणारी बांधकाम क्षेत्राची सिमेंटची मागणी पूर्ण करण्यात हा कारखाना सहाय्यक ठरेल.
त्याच वेळी, जेएसडब्ल्यू सिमेंटचे सीईओ नीलेश नार्वेकर म्हणतात की, उत्तर भारतातील या राज्यांचा जीडीपी वाढीचा दर देशात सर्वाधिक आहे आणि पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. या वेगाने वाढणाऱ्या बांधकाम बाजारपेठेत पाऊल ठेवण्यासाठी कंपनी खूप उत्साहित आहे.