राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून जो बिडेन यांची माघार

वॉशिंग्टन : जो बिडेन यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे. 81 वर्षीय बिडेन यांच्या मानसिक आरोग्याचा संदर्भ देत त्यांच्या उमेदवारीबद्दल रिपब्लिकन पक्षामधून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार बिडेन यांनी आपला प्रचार संपल्याची घोषणा केली. प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या डिबेटमध्ये हार झाल्यानंतर त्यांच्या […]

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून जो बिडेन यांची माघार

वॉशिंग्टन : जो बिडेन यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे. 81 वर्षीय बिडेन यांच्या मानसिक आरोग्याचा संदर्भ देत त्यांच्या उमेदवारीबद्दल रिपब्लिकन पक्षामधून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार बिडेन यांनी आपला प्रचार संपल्याची घोषणा केली. प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या डिबेटमध्ये हार झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारी माघारीची चर्चा सुरू झाली होती.
आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार कोण उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांसाठी नवीन उमेदवार शोधणे डेमोक्रॅट कॅम्पसाठी खूप आव्हानात्मक असेल. मात्र सद्यस्थितीत कमला हॅरिस यांचे नाव आघाडीवर आहे.
गेल्या काही दिवसात सहकारी डेमोव्रॅट्सनी, बिडेनच्या मानसिक आरोग्याचा हवाला देऊन वेगवेगळ्या मंचांवर पुनरुच्चार केला होता की संपूर्ण डेमोक्रॅट कॅम्पच्या समर्थनासाठी त्यांचे शर्यतीत राहणे चांगले नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही जो बिडेन यांनी माघार घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.