जेजे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर

जे.जे. रूग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहे. सेवेत रिक्त पदे तातडीने भरावी तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, बदली कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत.    तसेच या बेमुदत संपामुळे रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांना रुग्णालय प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असे कर्मचारी संघटनेने सांगितले आहे. जे.जे. रुग्णालयात (J.J.Hospital) येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातही कर्मचारी विहित वयानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सध्या, जेजे रुग्णालयात 1352 मंजूर खाटा आहेत.  मात्र गेल्या दहा वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती न केल्यामुळे रुग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुट्याही घेता येत नाहीत, या सगळ्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासन भरतीसाठी वेळ मारून नेण्याचे धोरण राबवत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्त जागांवर कामगारांची थेट भरती करण्याबाबत प्रशासन वेळकाढू धोरण राबवत आहे. त्यामुळे 3 जुलै 2024 पासून बेमुदत काम बंद आणि असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या बेमुदत संपामुळे (undefinate strike) रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता संघटनेचे सरचिटणीस सत्यवान सावंत यांनी व्यक्त केली आहे आणि यासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असेल.हेही वाचा ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा महाराष्ट्रातील विधवांना वारसा प्रमाणपत्रासाठी 10 हजार रुपये आकारण्यात येणार

जेजे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर

जे.जे. रूग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहे. सेवेत रिक्त पदे तातडीने भरावी तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, बदली कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत.   तसेच या बेमुदत संपामुळे रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांना रुग्णालय प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असे कर्मचारी संघटनेने सांगितले आहे.जे.जे. रुग्णालयात (J.J.Hospital) येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातही कर्मचारी विहित वयानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सध्या, जेजे रुग्णालयात 1352 मंजूर खाटा आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती न केल्यामुळे रुग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुट्याही घेता येत नाहीत, या सगळ्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे.कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासन भरतीसाठी वेळ मारून नेण्याचे धोरण राबवत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्त जागांवर कामगारांची थेट भरती करण्याबाबत प्रशासन वेळकाढू धोरण राबवत आहे. त्यामुळे 3 जुलै 2024 पासून बेमुदत काम बंद आणि असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या बेमुदत संपामुळे (undefinate strike) रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता संघटनेचे सरचिटणीस सत्यवान सावंत यांनी व्यक्त केली आहे आणि यासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असेल.हेही वाचा’मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करामहाराष्ट्रातील विधवांना वारसा प्रमाणपत्रासाठी 10 हजार रुपये आकारण्यात येणार

Go to Source