जितोचा महिला दिन विविध कार्यक्रमांनी
बेळगाव : महिला दिनानिमित्त जितो लेडिज विंगतर्फे जितोमधील महिला व जितो हॉस्टेलमधील मुलींसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी हिमोग्लोबिन, अॅनिमिया, थायरॉईड, ब्लडशुगर, बीएमडी, मौखिक आरोग्य, नेत्र चिकित्सा, ईएनटी तपासणी, त्वचा विकार, स्त्राrरोग आदींची तपासणी करून सल्ला देण्यात आला. या शिवाय मॅमोग्राफी करण्यात आली. 24 मुलींना सर्व्हायकल लस देण्यात आली. या शिबिरासाठी डॉ. देवगौडा व डॉ. सविता कद्दु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रारंभी रंजन पोरवाल यांनी नवकार मंत्र म्हटला. चेअरपर्सन माया जैन यांनी स्वागत केले. विभागीय चेअरमन वीरधवल उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अंजना बागेवाडी यांनी शिबिराचा हेतू सांगितला. प्रमुख पाहुणे हरवर्धन इंचल यांनी रोपाला पाणी घालून उद्घाटन केले. ममता जैन यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी जितोचा महिला दिन विविध कार्यक्रमांनी
जितोचा महिला दिन विविध कार्यक्रमांनी
बेळगाव : महिला दिनानिमित्त जितो लेडिज विंगतर्फे जितोमधील महिला व जितो हॉस्टेलमधील मुलींसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी हिमोग्लोबिन, अॅनिमिया, थायरॉईड, ब्लडशुगर, बीएमडी, मौखिक आरोग्य, नेत्र चिकित्सा, ईएनटी तपासणी, त्वचा विकार, स्त्राrरोग आदींची तपासणी करून सल्ला देण्यात आला. या शिवाय मॅमोग्राफी करण्यात आली. 24 मुलींना सर्व्हायकल लस देण्यात आली. या शिबिरासाठी डॉ. देवगौडा व डॉ. […]
