जिओ फायनान्शियलचे बाजारमूल्य 2 लाख कोटींच्या पुढे

कंपनी 6 महिन्यांपूर्वीच रिलायन्समधून वेगळी झाली : रिलायन्सने देखील 2,989 चा सर्वोच्च टप्पा गाठला : वृत्तसंस्था/ मुंबई जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचे बाजारमूल्य हे पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. आजच्या घडीला जेएफएसएल समभागांनी तब्बल 14.50 टक्क्यांच्या वाढीसोबत 347 चा सर्वोच्च टप्पा प्राप्त केला आहे. तथापि, दुपारी 12 वाजता त्याच्या उच्चांकावरून किंचित खाली येत, बॉम्बे […]

जिओ फायनान्शियलचे बाजारमूल्य 2 लाख कोटींच्या पुढे

कंपनी 6 महिन्यांपूर्वीच रिलायन्समधून वेगळी झाली : रिलायन्सने देखील 2,989 चा सर्वोच्च टप्पा गाठला :
वृत्तसंस्था/ मुंबई
जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचे बाजारमूल्य हे पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. आजच्या घडीला जेएफएसएल समभागांनी तब्बल 14.50 टक्क्यांच्या वाढीसोबत 347 चा सर्वोच्च टप्पा प्राप्त केला आहे. तथापि, दुपारी 12 वाजता त्याच्या उच्चांकावरून किंचित खाली येत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 9.62 टक्केच्या वाढीसह स्टॉक 332.20 वर व्यवहार करत होता. या किंमतीत कंपनीचे बाजारमूल्य 2.11 लाख कोटी रुपये आहे. त्याचवेळी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देखील 2,989 चा सर्वकालीन उच्चांक गाठला.
दुपारी 12 वाजता, रिलायन्सचे समभाग हे 0.48 टक्केच्या वाढीसह 2,977.45 वर व्यवहार करत होते. 20.14 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
जेएफएसएल 21 ऑगस्ट 2024 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला. सहा महिन्यांपूर्वी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून विभक्त करण्यात आली होती. डिमर्जरनंतर, जिओ फायनान्शिअलच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली.
ग्राहक आणि व्यापारी कर्ज व्यवसायाची योजना
जिओ फायनान्शियल ग्राहक आणि व्यापारी कर्ज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॅक्वेरीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायाला पेटीएम आणि इतर फिनटेक कंपन्यांसाठी बाजारातील वाढीच्या दृष्टीने मोठा धोका असल्याचे वर्णन केले होते.
रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायात 6 कंपन्यांचा समावेश
? रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड
? रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड
? जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड
? रिलायन्स रिटेल फायनान्स लिमिटेड
? जिओ इन्फॉर्मेशन अॅग्रीगेटर सर्व्हिसेस लिमिटेड
? रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड गुंतवणूक