Jio Down: संपूर्ण मुंबईत रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन!
मुंबईत जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याची बातमी आहे. जिओचे युजर्सला कॉल लावायला त्रास जाणवला. अद्याप कंपनीने या बद्दल कोणतेही वक्तव्य जारी केले नाही. जिओचे युजर्स नेटवर्क नसल्याची तक्रार करत आहे.
आज सकाळ पासून जिओचे नेटवर्क येत नसल्याचे युजर्सने सांगितले. मंगळवारी आज दुपारी 12 वाजे पर्यंत जिओ नेटवर्कशी संबंधित समस्यांचे 10 हजारांहून अधिक अहवाल प्राप्त झाले आहे.
देशभरातील युजर्स जिओची सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत. मोबाईल इंटरनेट नीट काम करत नसल्याच्या आणि अनेकांना नीट सिग्नल मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. जिओ फायबर देखील योग्यरित्या काम करत नाही.
Is Reliance Jio working for you? #Jiodown pic.twitter.com/2GAppa7KdS
— Hardwire (@Hardwire_news) September 17, 2024
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Jio Down देखील ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणावर मीम्स शेअर करत आहेत.
Edited by – Priya Dixit