चित्रपट झुंड’ फेम कलाकाराचा खून, मित्राला अटक

प्रसिद्ध सिने दिगदर्शक नागराज मंजुळेच्या झुंड चित्रपटातील फेम कलाकाराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री असे या तरुणाचे नाव असून त्याने झुंड चित्रपटात बाबू छत्रीची भूमिका साकारली होती.

ALSO READ: लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ३ जण गंभीर जखमी

या चित्रपटात प्रियांशु यांना विनोदी अभिनयासाठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

मिळालेल्या वृत्तानुसार, प्रियांशुची हत्या नागपूरच्या जरीपटका भागात झाली असून त्याचा मित्रानेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी मित्र ध्रुव साहूला अटक केली आहे. दोघांमध्ये नशेच्या अवस्थेत मंगळवारी वाद झाला आणि रागाच्या भरात ध्रुवने प्रियांशूवर धारदार शस्त्राने वार केला आणि त्याला जबर जखमी केले. 

ALSO READ: अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
स्थानिकांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशुच्या अंगावर प्लास्टिक गुंडाळलेले असून तो अर्धनग्न अवस्थेत आढळला.

पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ध्रुवला अटक केली आहे. 

Edited By – Priya Dixit  

  ALSO READ: अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन