झारखंड, ओडीशा : सत्ताधाऱ्यांना आशा

झारखंड आणि ओडीशा ही एकमेकांना लागून असणारी राज्ये असून या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल वातावरण राहिले आहे. झारखंड हे राज्य पूर्वी बिहारचा भाग होते. 2000 मध्ये त्याला बिहारपासून वेगळे करुन भिन्न राज्याची निर्मिती करण्यात आली. ओडीशा हे राज्य पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ही राज्यांचे भौगोलिक सान्निध्य असले तरी त्यांच्या राजकीय प्रकृतीमानात […]

झारखंड, ओडीशा : सत्ताधाऱ्यांना आशा

झारखंड आणि ओडीशा ही एकमेकांना लागून असणारी राज्ये असून या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल वातावरण राहिले आहे. झारखंड हे राज्य पूर्वी बिहारचा भाग होते. 2000 मध्ये त्याला बिहारपासून वेगळे करुन भिन्न राज्याची निर्मिती करण्यात आली. ओडीशा हे राज्य पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ही राज्यांचे भौगोलिक सान्निध्य असले तरी त्यांच्या राजकीय प्रकृतीमानात पुष्कळ अंतर आहे. हे अंतर निवडणुकांमध्ये उतरलेले दिसून येते. झारखंडमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तनाची प्रथा या राज्याच्या जन्मापासूनच आहे, तर ओडीशामध्ये गेली 25 वर्षे बिजू जनता दल या एकाच पक्षाचे राज्य आहे. ओडीशात लोकसभा निवडणुकीसमवेतच विधानसभा निवडणूकही होत आहे. झारखंडने गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात यश ओतले आहे, तर ओडीशात टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढताना दिसत आहेत. झारखंडमध्ये 14 तर ओडीशामध्ये 21 लोकसभेच्या जागा असून या 35 जागांवर सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्षांनाही अपेक्षा आहेत. यंदा ही राज्ये कोणाला कौल देतील, यासंबंधीचा हा आढावा…
झारखंड  राष्ट्रीय-स्थानिक पक्षांना प्राधान्य
पार्श्वभूमी
?           झारखंड राज्याची निर्मिती छत्तीसगड आणि उत्तराखंड यांच्याप्रमाणे 2000 मध्ये करण्यात आली आहे. या राज्यात प्रथम विधानसभा निवडणूक 2000 मध्येच घेण्यात आली होती. आतापर्यंत या राज्यात तीनदा काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या युतीचे दर दोनदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे.
? वन आणि खनिज संपत्तीने हे राज्य समृद्ध आहे. या राज्याची निर्मिती होण्यापूर्वी चार दशकांपर्यंत बिहारमधून त्याला वेगळे करण्याची मागणी केली जात होती. भारतीय जनता पक्ष आणि शिबू सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चा यांनी कधी संयुक्तरित्या तर कधी स्वतंत्रपणे हे आंदोलन चालविले होते.
? आंदोलनाला यश येऊन नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत तीनदा युती झाली आहे. तर भारतीय जनता पक्षाने बहुतेकवेळा स्वतंत्रपणे निवडणुकांमध्ये सहभाग घेतला आहे. छोट्या पक्षांशी युतीही केली आहे.
विविध समाजगट
? या राज्यात वनवासी आणि अनुसूजित जातींच्या लोकांची संख्या मोठी आहे. वनवासी 28 टक्के, तर अनुसूचित जनसंख्या 12 टक्के असून त्यांची एकंदर संख्या 40 टक्के आहे. त्या प्रमाणात राज्यात या दोन समाजघटकांसाठी आरक्षित असणाऱ्या जागांचे प्रमाणही मोठे आहे. राज्यात लोकसभेच्या 14 जागा आहेत.
? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात वनवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याने ख्रिश्चन समुदायही येथे आहे. मुस्लीमही आठ टक्के इतक्या प्रमाणात आहेत. छोटा नागपूर आणि संथाल परगाणा या भागांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामुळे अवैध धर्मांतरांना खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
? वनवासी, अनुसूजित जातींशिवाय अन्य मागासवर्ग हा मोठा समाजघटक राज्यात आहे. सवर्णांची संख्या 10 टक्क्यांच्या आसपास असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला या समाजघटकांशी जुळवून घेत, आपली राजकीय वाटचाल करावी लागते. भारतीय जनता पक्षाचा भर हिंदू समाजावर अधिक आहे.
गेल्या चार निवडणुकांमध्ये…
? 2004, 2009, 2014 आणि 2019 या मागच्या चार लोकसभा निवणुकांपैकी तीन निवडणुकांवर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव राहिल्याचे दिसते. 2004 च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र 2009 मध्ये 8, 2014 मध्ये 12 आणि 2019 मध्ये 11 जागा या पक्षाने प्राप्त केल्या आहेत. यंदाही या पक्षाला अशाच मोठ्या यशाची अपेक्षा आहे.
? काँग्रेसने येथे 2004 च्या निवडणुकीत सहा जागा मिळविल्या होत्या. तर झारखंड मुक्ती मोर्चाला 4 जागा मिळाल्या होत्या. हे काँग्रेसचे गेल्या चार निवडणुकांमधील सर्वाधिक यश आहे. यंदाही या पक्षाने झारखंड मुक्ती मोर्चाशी युती केली असून मोर्चा सात जागांवर तर काँग्रेस सात जागांवर मैदानात आहे.
निवडणुकीपूर्वी महत्वाच्या घटना…
? राज्याचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना अटक झाली आहे. त्यांना अद्यापही जामीन मिळालेला नाही. त्यांनी अटक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडले आणि नव्या नेत्याची निवड करण्यात आली.
? काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा खासदार धीरजप्रसाद साहू यांच्याशी संबंधित निवासस्थानांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडींमध्ये 351 कोटी रुपयांची रोख हाती लागली. एका धाडीत हस्तगत करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मानली जाते. हा काँग्रेसला धक्का होता.
काय घडू शकते…
? विविध मतदानपूर्व सर्वेक्षणांचा विचार करता यंदाही येथे केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची सरशी होऊ शकते. काहींच्या अनुमानानुसार 13 ते 14 जागा या पक्षाला मिळू शकतात. तथापि, झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांनी युती केल्याने या पक्षांनाही चांगल्या यशाची अपेक्षा आहे.