मुंबईत बंदूक आणि चाकू दाखवत दुकानातून 1.91कोटी रुपयांचे दागिने लुटले

Mumbai News: मुंबईतील महालक्ष्मी परिसरात दोन जणांनी बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून दागिन्यांच्या दुकान लुटले, अशी माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी 1.91 कोटी रुपयांचे सोने-चांदी लंपास केले. आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सात रास्ता परिसरात ही घटना घडली. “दोन आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना बांधून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि 1.91 कोटी रुपयांचे दागिने चोरून पळून गेले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, गुन्हे शाखा देखील या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी 5-6 पथके तयार केली आहे. पोलिसांनी सांगितले की, दुकान मालक भवरलाल धरमचंद जैन यांनी तक्रार दाखल केली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source