झेवर गॅलरी डायमंड, रॉजर्स सुपर किंग्स विजय
विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातुन झेवर गॅलरी डायमंडने के आर शेट्टी किंग्स संघाचा तर रॉजर्स सुपर किंग्सने टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमी संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्वयंम खोत, विवान भूसद यांना सामनाविर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना पहिला सामन्यात जेवर गॅलरी डायमंड संघाने के आर शेट्टी किंग्स संघाचा 5 गड्यांनी पराभव केला. रात्री झालेल्या पावसामुळे 17 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात के आर शेट्टी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात 6 गडी बाद 87 धावा केल्या. त्यात स्वयंम खोतने 4 चौकारांसह 42, मोहम्मद अब्बासने एक चौकारासह 20 धावा केल्या. झेवर गॅलरी तर्फे मोहम्मद हमजा व जियान सलेमवाले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अटीतटीच्या झालेल्या लढतीत झेवर गॅलरी संघाने केवळ 2 चेंडू व 5 गडी राखून विजय मिळवला. झेवर गॅलरी संघाने 16.4 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा करून हा सामना जिंकला. त्यात लक्ष खतायतने 4 चौकारांसह 25, अजय लमानीने 3 चौकारांसह 19, सचिन तलवारने 3 चौकारासह 16 धावा केल्या. के.आर. शेट्टी किंग्ज तर्फे वरदराज पाटील व मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात एकतर्फी लढतीत रॉजर्स सुपर किंग्स संघाने टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमी संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 24.4 षटकात सर्व गडीबाद 87 धावा केल्या. त्यात कर्णधार कौस्तुभ पाटील यांनी एकाकी लढत देताना 8 चौकारांसह 43 धावा केल्या. रॉजर सुपर किंग्स तर्फे विवान भूसदने 3 तर साईराज चव्हाणने 2 गडी व जीतीन दुर्गाईने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर सुपर किंग्स संघाने 13 षटकात 1 गडाच्या मोबदल्यात 89 धावा करून सामना जिंकला. त्यात अवनीश हट्टीकरने 7 चौकारासहने 33, अनिश तेंडुलकरने 4 चौकारांसह 27, शाहऊख धारवाडकरने चौकारांसह 22 धावा केल्या. टिळकवाडी तर्फे ओमकार करेहोना याने एक गडीबाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आयुब खान पठाण संतोष जिंतीकट्टी व झेवियर गोम्स यांच्या हस्ते सामनावीर स्वयंम खोत व इम्पॅक्ट खेळाडू लक्ष खतायत यांना चषक देऊन डी बाद केला दुसऱ्या सामन्यात प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई होळाप्पा पुजेरी व प्रदीप झुनके यांच्या हस्ते सामनावीर विवान भूसद खेळाडू अवनीश हट्टीकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले
Home महत्वाची बातमी झेवर गॅलरी डायमंड, रॉजर्स सुपर किंग्स विजय
झेवर गॅलरी डायमंड, रॉजर्स सुपर किंग्स विजय
विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातुन झेवर गॅलरी डायमंडने के आर शेट्टी किंग्स संघाचा तर रॉजर्स सुपर किंग्सने टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमी संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्वयंम खोत, […]