येशूख्रिस्तांनी दिला शांती, प्रेमाचा संदेश
नाताळ सण म्हणजे आनंदाचा क्षण. ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ सण महत्त्वाचा असून जगभरात दरवर्षी 25 डिसेंबरला प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूचे जीवनकार्य दाखविले जाते. ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्मीयही हा सण साजरा करतात. नाताळ सण सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो. येशू ख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेचा संदेश दिला. प्रेमाच्या आणि मानवतेच्या शिकवणीतून नाताळ समाजातील सर्व घटकांची एकजूट करतो. आणि वर्षाच्या या विशेष काळी लोक अधिक संयम, दयाळू, क्षमाशील होऊन भेटवस्तू देऊन लोकांमध्ये आपुलकी आणि प्रेम अर्पण करतात. ख्रिस्ती लोक आपल्या तारणहार येशूच्या जन्माच्या आठवणीस्तव आपला आनंद व्यक्त करतात. अखिल मानवजातीच्या कल्याण व मुक्ततेसाठी मानवाला प्रोत्साहित करण्यासाठी देवाचा एकुलता एक पुत्र सृष्टीच्या प्रेमाखातर पृथ्वीवर येतो आणि जनावरांच्या गोठ्यात डोंगराच्या बाजूला जन्माला येतो. देवाचा पुत्र एका झोपडीत जन्म घेतो. हा विचार अनेकांना विचित्र वाटल्यास आश्चर्य नसावे. आपल्याकडे दरिद्री नारायणाची संकल्पनाच आहे.
ख्रिसमस उत्सवादरम्यान आपल्या सभोवतालच्या वास्तवावर चिंतन करण्याची नितांत गरज आहे. आपल्या अवतीभवती एक कटाक्ष टाकला तरी मृत्यू, रोग, विनाश याचे आपण उपासक बनलो आहोत. खरं तर ख्रिस्त म्हणतात, ‘मी त्यांना जीवन मिळावं आणि विपुलतेने मिळावं म्हणून आलो आहे.’ आपण माणसं विचित्र प्रजाती आहोत, आपण प्रथम स्वत:ला दुखावण्याची परिस्थिती निर्माण करतो आणि नंतर वादविवादांचे आयोजन करून वाद घालत बसतो. त्यांच्या घातक परिणामांना कसे सामोरे जावे हे शोधण्यासाठी आम्ही शिखर परिषदा आयोजित करतो. युद्ध आणि हिंसाचार निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करतो आणि त्यानंतर शांततेसाठी चर्च, मशिदी, गुरुद्वारा व मंदिरांमध्ये प्रार्थना करतो. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील ताज्या संघर्षामुळे निष्पाप जनतेचे आणि पर्यावरणाचे प्रचंड हाल होत आहेत. मणिपूरमध्ये वांशिक निर्मूलनाच्या आयोजनाचे पडसाद दिसून येत आहेत.
आपण प्रथम कचरा, घाण, विषारी वायू निर्माण करतो आणि त्यानंतर पर्यावरणाबद्दल बोलतो. अतिवापर, गैरवापर करण्याच्या आपल्या उपभोगवादी वृत्तीमुळे पृथ्वीवरील संसाधनांचा नाश होत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे सखोल पर्यावरण रुपांतरण आवश्यक आहे. नवीन अधिक जबाबदार, दयाळू, न्याय व जगण्याचा मार्ग दाखविणारा समाज घडविणे गरजेचे आहे. मानव आणि सृष्टीचा परमेश्वराशी तुटलेल्या नात्यांचा समेट पुन्हा एकदा घडवून आणण्यासाठी प्रभू ख्रिस्तांनी जन्म घेतला. नाताळाच्या अनुषंगाने आपण भेटवस्तू देताना त्याच्या गुणवत्तेवर नाही तर देणगी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे. गरीब व होतकरू कुटुंबांना संपर्क साधून त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मी या मंगलसमयी तुमच्याप्रति दैवी आशीर्वादाने आणि शांततेने भरलेल्या आनंददायी नाताळाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नाताळाचा जो गाभा आहे तो शांती असा आहे. सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:
– फादर सायमन फर्नांडिस, (रेक्टर, सेंट पॉल्स संस्था)
Home महत्वाची बातमी येशूख्रिस्तांनी दिला शांती, प्रेमाचा संदेश
येशूख्रिस्तांनी दिला शांती, प्रेमाचा संदेश
नाताळ सण म्हणजे आनंदाचा क्षण. ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ सण महत्त्वाचा असून जगभरात दरवर्षी 25 डिसेंबरला प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूचे जीवनकार्य दाखविले जाते. ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्मीयही हा सण साजरा करतात. नाताळ सण सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो. येशू ख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि […]